विलासरावांच्या जयंतीदिनी आदरांजली कार्यक्रम रद्द

40

लातुर/ प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ७५ व्या जयंतीदिनानिमित २६ मे रोजी बाभळगावातील विलासबाग येथे होणारा सामुहिक आदरांजली कार्यक्रम यावर्षी कोरोना व लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. देशमुख कुटुंबाच्या वतीने ही माहिती देण्यात आली.

सामूहिक आदरांजली चा कार्यक्रम २६ मे रोजी केला जात असतो. या कार्यक्रमास अनेक मान्यवरांसह नागरिक आपल्या नेत्याला आदरांजली अर्पण करतात. सध्या संपूर्ण जगावर कोविड १९ चे संकट कोसळले आहे. या कोविड १९ विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि देशभरात लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. सामाजिक, व्यक्तिगत अंतर पाळून या विषाणूचा प्रसार रोखण्याच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे एकत्रित लोक जमा होण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

सदरील परिस्थिती लक्षात घेता विलासराव देशमुख यांच्या ६५ व्या जयंतीदिनी बाभळगाव येथे सामूहिक आदरांजली कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात देशमुख कुटुंबियाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली असून सर्वांनी त्या ठिकाणी राहूनच आपल्या नेत्यांना आदरांजली अर्पण करावी, असे आव्हान त्यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.