अंतिम सत्राच्या परीक्षा घेणं आम्हाला शक्य नाही : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री. उदय सामंत

174

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान समितीने अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान घ्याव्यात अशा सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे राज्य शासनाने निर्णय घेतला होता. पण, सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रापर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. त्याचप्रमाणे अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द कराव्यात याविषयी विद्यापीठ अनुदान आयो(युजीसी)सोबत पत्रव्यवहार सुरू असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

राज्यातील जवळपास १० लाख विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा तसेच मानसिक स्वास्थ्याचा विचार करता अंतिम सत्राच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना मार्क्स ग्रेडेशन पद्धतीने देण्याविषयी युजीसी लिहिले आहे. याप्रकारे ग्रेडेशन करताना कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही अशा पद्धतीने हे मार्क्स ग्रेडेशन करण्यात येणार आहे. युजीसीच्या मार्गदर्शनानुसारच हे ग्रेडेशन देण्यात यावे. याविषयी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका घेतली असून त्यांच्याशी याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शासन राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल. विद्यार्थ्यांच्या हिताचा, आरोग्याचा आणि मानसिक स्वास्थ्याचा विचार करून युजीसीला पत्र केले आहे. या पत्राचा युजीसीला विचार करावाच लागेल, असे. सामंत म्हणाले.

याविषयी ठोस निर्णय घेण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, मुख्य सचिव अजोय मेहता, शिक्षण सचिव विजय सौरव यांची बैठक घेण्यात येणार आहे. तसेच राज्यातील कुलगुरूंशी चर्चा करून युजीसीच्या सुचनांप्रमाणे ग्रेडेशनची पद्धत स्वीकारून पुढे काय करायचे याविषयी मुख्यमंत्री यांच्या संमतीने येत्या दोन दिवसात ठोस निर्णय घेतला जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.