लातूरात फिजिकल डिस्टन्सचे तीनतेरा

62

लातुर /प्रतिनिधी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने व्यापाऱ्यांना दिवस ठरवून देण्यात आली आहेत. त्यानुसार शहरातील सोने चांदी, कापड दुकान, भांडी, फुट वेअर , अशा दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र लातुरकर कुठलेही नियम पाळताना दिसत नाहीत. फिजिकल डिस्टनाचा बोजवारा उडाल्याचे चित्र होते. किमान आता तरी लातुरकरांनी शहणे होऊन प्रशासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात लातुरात कोरोनाचा शिरकाव होणार नाही.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.