रायपूर ग्रामपंचायतीत शिपाई पदावर ‘सरपंचपुत्र’, इतर उमेदवारांचा निवडीवर आक्षेप

108

गंगापूर/प्रतिनिधी :- रायपूर ग्रामपंचायतीत शिपायांच्या रिक्त पदासाठी जानेवारीत आवेदन काढण्यात आले होते.त्यासाठी सात उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्जही सादर केले. परंतु या सात अर्जापैकी सरपंचपुत्राचीच शिपाई पदावर निवड परस्पर करण्यात आली असा आरोप उमेदवार सागर कीर्तिकर आणि प्रशांत किर्तीकर यांनी केला आहे. सागर हा आल्पभुधारक आहे व त्याची शैक्षणिक पात्रता पदवीधर आहे. प्रशांत हा भुमीहीन असुन त्यांची ही पात्रता पदवीधर आहे. निवड करण्यात आलेल्या गणेश सरपंच पुत्राची शैक्षणिक पात्रता ही बारावी आहे. उच्च शिक्षीत उमेदवारांना डावलुन पुत्रास शिपाई पदावर निवड करण्यात आली असा अक्षेप इतर उमेदवारांनी घेतला आहे.

बेकायदेशीर आणि कोणत्याही उमेदवाराला सूचना न करता ही निवड सरपंच यांनी केली आहे. या निवड प्रक्रियेबद्दल विचारणा केली असता संबंधितांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे आपण याप्रकरणात लक्ष घालून योग्य न्याय द्यावा अस गटविकास अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनात म्हंटल आहे.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.