राज्यात अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा

67

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत आपल्या घरापासून दूर राज्यातील विविध भागांमध्ये अनेक मजूर, कामगार, विद्यार्थी ,भाविक, यात्रेकरू अडकले आहेत. त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी राज्य शासनाने काही अटी-शर्तींच्या अधीन राहून एसटीने मोफत बस प्रवास सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊन कालावधीत अडकलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. पण कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना कोणत्याही प्रवासाची मुभा देण्यात येणार नाही,अशी माहिती परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली.

यातील महत्त्वाच्या बाबी :

सोशल डिस्टन्सिंग नियमानुसार एका एसटी बसमध्ये एकावेळी 22 जणांचा ग्रुप प्रवास करु शकणार आहे. 22 जणांच्या ग्रुप लीडरला पोलीस स्टेशन आणि ग्रामीण भागात जिल्हाधिकारी किंवा तहसीलदाराला प्रवासाच्या परवागनीसाठी अर्ज करावा लागेल. तसेच प्रवाशांना आधार कार्ड किंवा अधिकृत ओळखपत्र दाखवत स्वतःची ओळख द्यावी लागेल, प्रवासादरम्यान प्रवाशाला मास्क लावणे अनिवार्य असेल, एसटी बसमध्ये एका एका सीटवर एकच प्रवासी बसेल.

या प्रवासासाठी नागरिकांनी जेथे पोलिस आयुक्तालय आहे, तेथील संबंधित नोडल ऑफिसरचे अनुमती पत्र व इतर ठिकाणी नोडल ऑफिसर म्हणून जिल्हाधिकारी/तहसीलदार यांच्या अनुमतीचे पत्र घेणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.