सहा वर्षाच्या तस्किनने केला पहिला रोजा

181

हिंगोली/प्रतिनिधी : मुस्लीम धर्मात महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या रमजानचे रोजे (उपवास ) शनिवारपासून सुरू झाले आहेत.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा या पवित्र महिन्याच्या सार्वजनिक उत्साहाला खीळ बसली असून सर्व विधी घरीच पार पाडायच्या आहेत.
मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हाळ्यात रमजानचे रोजे करणे प्रौढ व्यक्तींनासुद्धा सहज शक्य होत नाही. अश्यातच कळमनुरी शहरातील रजा मैदान परिसरातील तस्किन मोसीन पठाण या सहा वर्षाच्या चिमुकलीने आपल्या जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला आहे.त्यामुळे तिचे विविध स्थरातून कौतुक होत आहे.

कमी वयात रोजा पूर्ण केल्याबद्दल तिचे वडील मोसिन पठाण, आजोबा साहेब पठाण, आयुब पठाण, खाजामिया शेख, मामा अफसर,अकबर, अन्वर, अमर शेख, काका सलमान, इमरान पठाण आदीसह अनेकांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.