राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाची लागणार वर्णी ? ‘ही’ नावे चर्चेत

144

औरंगाबाद/ प्रतिनिधी : राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

नवीन प्रदेशाध्यक्षपदी प्रदेश सरचिटणीस आकाश झांबरे, मयूर सोनवणे (औरंगाबाद), मयूर पटारे (अहमदनगर) कन्हैया कदम (नांदेड) यांची नावे चर्चेत आहे.


मराठवाड्याला मिळणार संधी
औरंगाबाद जिल्ह्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर सोनवणे यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. त्यांची या पदावर निवड झाल्यास मराठवाड्याला नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. नेमकी प्रदेशाध्यपदाची माळ कोण्याच्या गळ्यात पडणार याविषयी उत्सुकता लागलेली आहे.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.