कोरोनाचा महाराष्ट्रात एकही रुग्ण नाही

81

मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीमुळे सर्वसामान्यांनी प्रतिबंधासाठी मास्कऐवजी स्वच्छ धुतलेला रुमाल वापरावा. जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण केवळ अडीच ते तीन टक्के असून या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. समाजमाध्यमांवर चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश सायबर क्राईम शाखेला दिले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एकही संशयित रुग्ण आढळला नाही. नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. सर्वांनी एकत्रितपणे या विषाणूचा मुकाबला करुया, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानपरिषदेत केले.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.