कैद्यांमुळे पालटले मैदानाचे रुपडे

185

औरंगाबाद / प्रतिनिधी (शुभांगी भोकरे) : हर्सूल मध्यवर्ती कारागृहाच्या शेजारी असलेल्या विस्तीर्ण मैदानाचा हर्सूल कारागृह पोलिस उपमहानिरीक्षक दिलीप झळके आणि कारागृह अधीक्षक हिरालाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली  कैद्यांच्या मदतीने  सतरा एकराच्या परिसरातील मैदानाचा कायापालट केला आहे. 

अनेक महिने कचरा डेपो, मद्यपींचा अड्डा आणि झाडा-झुडपांनी हे मैदान व्यापले होते. या मैदानात कैद्यांनी श्रमदान करून मैदान परिसरातील नागरिकांसाठी दिलासा देणारे ठरत आहे. या ठिकाणी कैद्यांनी तब्बल दोन महिने श्रमदान करून हे मैदान चकाचक केले आहे. ते आता नागरिक आणि खेळाडूंसाठी उपयोगाचे ठरत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मैदानावर कचरा टाकण्यात यायचा. येथे मोठ्या प्रमाणावर झाडेझुडपे उगवलेली होती. सायंकाळी या ठिकाणी पादचाऱ्यांना पायी चालणे अवघड होते. रात्रीच्या सुमारास मद्यपी रिक्षाचालक या ठिकाणी रिक्षा उभ्या करून यथेच्छ मद्यप्राशनाचा कार्यक्रम करीत होते. परिसरात इतकी मोठी जागा असून देखील ती स्वच्छ नसल्याने नागरिकांना हे मैदान असून अडचण नसून खोळंबा होते. ही बाब हर्सूल कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव यांच्या लक्षात आली. त्यांनी या मैदानाची स्वच्छता मोहीम राबवण्याचे ठरवले. गेल्या दोन महिन्यांपासून कारागृहातील चाळीस ते पन्नास बंदिवान दिवसातून पाच ते सहा तास या मैदानावर स्वच्छता मोहीम राबवत होते. मैदानावरील झाडे हटवण्यात आली. कचरा उचलण्यात आला. या प्रदीर्घ श्रमदानानंतर मैदानाने कात टाकली आहे. 

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.