शेवटी मनासारखे झाले, मात्र निराशा….

68
संपूर्ण राज्याला, देशाला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी हत्याकांड, निर्भया हत्याकांड या आणि अजून अश्या कित्येक दुर्दैवी घटना घडल्या ज्यामध्ये मुलींचा हकनाक बळी गेला आणि आरोपीना फाशीची शिक्षा सुनावली गेली. यावर आम्हा मुलींचे मात्र समाधान नाही. ज्या मुलींसोबत दुर्दैवी घटना घडली.
तिच्यासोबत तिच्या घरच्यांना न्याय मिळाला हे मला मान्य नाही, कारण त्यांना न्याय तर मिळाला पण त्याची सोन्यासारखी लेख त्यांच्या पासून हिरावली गेली. आजघडीला डॉ. प्रियंका रेड्डी हत्याकांड या घटना घटनेतील नराधमांचे एन्काउंटर करून त्यांचा खात्मा केला गेला, मात्र काहींना पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलिसांचे अभिनंदन करावे वाटत असेलही त्याला माझा आक्षेप मुळीच नाही पण त्या आरोपींचा खात्मा झाला. आरोपींचा खात्मा झाला हे मनासारखे झाले मात्र घडलेल्या दुर्घटनेत पीडित मुलींचा जीव जातो याची निराशा आहे. रेड्डी कुटुंबियांना त्यांची मुलगी परत मिळाली का ? तर नाही ! एवढी मात्र अपेक्षा मनात आहे कि, यापुढे कोणत्याही नराधमाने असे कृत्य घडण्याच्या आधी दहा वेळा विचार केला पाहिजे.
अशा किती तरी दुर्दैवी घटना घडल्या त्यात काही दोष नसताना निरागस मुलींना त्यांचा जीव गमवावा लागला. का म्हणून या घटना घडतात तेव्हा तात्काळ काही कृती केली जात नाही ? का आरोपीला दोन दिवसाची दहा दिवसाची कोठडी सुनावली जाते ? का तिथल्या तिथे ठोस निर्णय घेतला जात नाही ? आरोपी हे बलात्काराच्या गुन्ह्यातील आहे त्यांनी गंभीर गुन्हा केला आहे त्याच्या शिक्षा गंभीर स्वरूपात का दिल्या जात नाही ? हे आणि नाना विविध प्रश्न मला सतावत असतात. आरोपीला शिक्षा मिळते हे थोड्याफार प्रमाणात स्वीकारले जाते मात्र त्या मुलीचा काय दोष जिने काही चुकी नसताना नराधमाच्या कृत्यामुळे जीव गमावला याचे उत्तर अनुत्तरीतच राहते.

 

लेखिका

शुभांगी किसनराव भोकरे

(पत्रकार)औरंगाबाद.

 

 

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.