हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊंटर

340
तेलंगणा : हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींचा मृत्यू झाला. तेलंगणा पोलिसांनी चारही आरोपींचा एन्काऊंटर केला. तपासासाठी नेत असताना सर्व आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी चारही जणांचा खात्मा केला. हैदराबाद पोलिस आयुक्तांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
हैदराबादमधील महिला डॉक्टरवर करण्यात आलेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी कोर्टाने सर्व आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर पोलीस कोठडीत या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि निर्घृण खुनाच्या बातमीने संपूर्ण देश हादरला होता.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.