डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ येथील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली घोषणा

89
मुंबई :  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह  कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परळ येथील बीआयटी चाळीत आले होते.
डॉ. आंबेडकर हे परळ दामोदर हॉलजवळील बीआयटी चाळ येथील इमारतीत दुसऱ्या माळ्यावर राहायचे. १९१२ ते १९३४ या २२ वर्षे कालावधीत त्यांचे येथे वास्तव्य होते. हे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  चैत्यभूमी दादर येथे केली.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.