गीत गायनातून समता वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे महामानवाला अभिवादन….

136
हिंगोली/प्रतिनिधी:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६३ वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्ताने मधोमती विद्यालय लाख संचालित ‘समता वसतिगृहा’तील विद्यार्थ्यांनी गीत गायनातून महामानवाला अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन ६ डिसेंबर १९५६ रोजी झाले. दिल्ली येथील डॉ. आंबेडकरांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बौद्ध धर्माचा अभ्यास केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. नागपूरात  १४ ऑक्टोबर १९५६  साली सुमारे ५  लाख अनुयायांनी त्यांना बौद्ध नेते म्हणून स्वीकारले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिवावर अंत्यविधी मुंबईतील दादर चौपाटीवर करण्यात आले. यावेळेस बौद्ध धर्माप्रमाणे त्यांच्यावर संस्कार करण्यात आले. त्यांनी देशातून अस्पृश्यता निर्मुलनाचे काम केल्याने त्यांना बुद्धिस्ट गुरू म्हणून देखील ओळखले जाते. त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आलेली जागा चैत्यभूमी म्हणून ओळखली जाते. बौद्ध धर्मीय आणि भीम अनुयायींसाठी ही जागा पवित्र आहे.
समता वस्तीगृतील विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून, गीत गायन आणि डॉ.बाबासाहेब यांच्या विचारांना उजाळा देत महामानवाला अभिवादन केले.यावेळी वसतिगृहाचे संचालक रामचंद्र भिसे,प्रा. आढाव,माधव पोले, नंदू काळे,पांडुरंग रणखांब,गणेश लठाड, संतोष चव्हाण यांसह विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.