ठाकरे सरकारला ‘इतक्या’ आमदारांचा पाठिंबा

124
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. १६९ आमदारांचा पाठिंबा हा उद्धव ठाकरे यांच्या सरकारला मिळाला आहे. यावेळी एमआयएमचे २, मनसेचे १, सीपीआयएच्या १ आमदाराने यावेळी तठस्थ भूमिका घेतली. तर भाजपने सभागृहातून सभात्याग केल्याने या प्रस्तावाच्या विरोधात ० मतं पडली.
दरम्यान अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली आहे. शनिवारी दुपारी २ वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनात आधी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील सदस्य यांचा परिचय झाला. भाजपा आमदारांकडून सभागृहात गदारोळ झाला.  आमदारांकडून घोषणाबाजी करण्यात आली. तसेच भाजपाने सभात्याग करत विश्वासदर्शक ठरावावर बहिष्कार टाकला.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.