आरे कारशेडच्या कामांना स्थगिती ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

42
मुंबई : राज्य शासनाचा कोणत्याही विकास कामांना विरोध नाही. मात्र, वैभव गमावून विकास कामे होणार नाहीत. त्यामुळे आरेमधील मेट्रोच्या कारशेडच्या कामाला स्थगिती दिली असून या कामाचा पूर्णपणे आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
विधीमंडळ पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
दरम्यान महागाई, टंचाई, भ्रष्टाचार यांचा सामना महाविकास आघाडीला करायचा आहे. मंत्रालयातल्या परंपरा, प्रथा मला ठाऊक नाहीत तरीही हे शिवधनुष्य उचललं आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. कराच्या रुपाने येणारा पैसा आपण कसा खर्च करतो? याचं उत्तर जनतेला द्यायचं आहे असंही प्रतिपादन त्यांनी केलं आहे. मोठी आव्हानं पाहून मी पळून गेलेलो नाही. हे आव्हान स्वीकारलं आहे.मी न सांगता मुख्यमंत्री झालो आहे. मी मुख्यमंत्री म्हणून येईन असं काही सांगितलं नव्हतं असं म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.