मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की ……

54
मुंबई : महाराष्ट्रात आज राजकारणाच्या नव्या पर्वाची सुरुवात होतीये. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी
राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून काल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली.
शिवाजी पार्क येथे झालेल्या शपथविधी समारंभात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्यासमवेत एकनाथ संभाजी शिंदे, सुभाष राजाराम देसाई, जयंत राजाराम पाटील, छगन चंद्रकांत भुजबळ, विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात, नितीन काशिनाथ राऊत यांनी राज्यपालांकडून मंत्रीपदासाठी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. मुख्य सचिव अजोय मेहता यांनी शपथविधी सोहळ्याचे संचलन केले.
दरम्यान शपथविधी कार्यक्रमास विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार शरद पवार, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री श्री. कमलनाथ, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनोहर जोशी, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, खासदार श्रीमती सुप्रिया सुळे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, तामिळनाडूचे माजी उप मुख्यमंत्री एम.के. स्टालिन, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासह राज्यातील खासदार, आमदार, विविध राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.