पहिल्याच कॅबिनेट बैठकीत उद्धव ठाकरेंकडून ‘हे’ महत्त्वाचे निर्णय

216

मुंबई /प्रतिनिधी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शपथविधीनंतर तात्काळ कॅबिनेटची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अनेक विषयांवर चर्चा करत काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. उद्धव ठाकरेंनी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी मोठा निर्णय घेतला. रायगडच्या संवर्धनासाठी जवळपास ६०६ कोटींचा खर्च आहे. यासाठी २० कोटी खर्च झाले आहेत, तर २० कोटी रुपये आजच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत मंजूर करण्यात आले. शेतकऱ्यांबाबत येत्या दोन दिवसात मोठा निर्णय घेऊ, असा शब्दही उद्धव ठाकरेंनी दिला.  अवकाळी पाऊस, दुष्काळाने हौदास घातला आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत केवळ फसव्या घोषणा झाल्या. मला घोषणांचा बाजार भरवायचा नाही. शेतकऱ्यांची आता पर्यंत फसवणूक झाली आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.  सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बैठकीस मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, डॉ.नितीन राऊत उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.