विधानसभेच्या आमदारांचा शपथविधी संपन्न

33
मुंबई : विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी १४ व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या २८८ पैकी उपस्थित २८५ सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. श्री. कोळंबकर यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ दिली आहे. सुधीर मुनगंटीवार आणि देवेंद्र भुयार हे अनुपस्थित असल्याने त्यांचा शपथविधी होऊ शकला नाही.
१४ व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांना शपथ देण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज विधानसभेची बैठक अभिनिमंत्रित केली होती. बैठकीचा प्रारंभ ‘वंदे मातरम्’ने तर समारोप राष्ट्रगीताने झाला.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.