महापौर उपमहापौरांनी स्वीकारला पदभार

114
लातुर /प्रतिनिधी : नूतन महापौर विक्रांत गोजमगुंडे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी पदभार स्वीकारला. यावेळी मनपा आयुक्त एम.डी.सिंह, उपायुक्त सभांजी वाघमारे, मावळते उपमहापौर देविदास काळे, विक्रम गोजमगुंडे, अशोक गोविंदपूकर , दिपक सुळ यासह आदींची उपस्थिती होती.
दरम्यान पत्रकार वार्तालाप करतात महापौर म्हणाले नागरिकांच्या सूचनांचा आदर करून पाणी वितरणासाठी मनपाने धोरणात्मक निर्णय घेतले आहे. त्यासाठी काही नियम ठरवले जाणार आहेत. कचरा व्यवस्थापन पारदर्शक कारभार करून लातूर गतवैभव प्राप्त करून दिले जाणार आहे. निवडणुकीच्या काळात काॅग्रेस पक्षाने जो वचननामा दिला, तो वचननामा पूर्ण करण्याचा प्रयत्न करु मालमत्ता कर, पाणीपट्टी, व्यापारी संकुलाचे भाडे या अनुषंगाने धोरणात्मक निर्णय घेऊन उत्पादन वाढवले जाईल. पे अँड पार्किंग बहुमजली पार्किंग, व्यवस्था केली जाणार आहे. गंजगोलाई येथील मार्केटमध्ये येण्यासाठी गुळ मार्केट परिसरातील बहुमजली पार्किंग व्यवस्था करण्याची संकल्पना आहे. गुळ मार्केट येथून वाहन पार्किंग केल्यानंतर गंजगोलाई तील बाजारपेठेत येण्यासाठी नि: शुल्क बस सेवा करण्याचा संकल्प असल्याचे सांगितले महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.