भाजपचे बंडखोर नगरसेवक गौड, बिराजदार निलंबित

176
लातूर/ प्रतिनिधी (राहुल माकणीकर) : लातूर महानगरपालिका महापौर पदाच्या निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या नगरसेवक गीता गौड, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांना भाजपातून निलंबित करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.
दरम्यान महापौर निवडणुकीत पक्षाने अधिकृत उमेदवार दिले होते. परंतु गीता गौड, चंद्रकांत बिराजदार यांनी पक्षाच्या धोरणाविरुद्ध जाऊन काम केले. भाजपा ऐवजी विरोधी पक्षाला मदत केली. ही कृती पक्षविरोधी असल्याने या दोघांना पक्षातून निलंबित करण्यात असल्याची माहिती भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, संघटना सरचिटणीस गुरुनाथ मगे, मनपा गटनेते शैलेश गोजमगुंडे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.