अजित पवारांना मोठा दिलासा ; सिंचन घोटाळ्याप्रकरणी चौकशीच्या फायली बंद!

83
मुंबई : राष्ट्रवादीचे बंडखोर नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलासा मिळाला आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सिंचन प्रकल्प घोटाळ्याची उघड चौकशी बंद करण्यात आली आहे. सिंचन घोटाळ्याती ९ प्रकरणातील उघड चौकशी बंद करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर महासंचालक बिपीन कुमार सिंह यांनी दिले आहेत. त्यामुळे अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान २३ नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी भाजपला पाठिंबा दिल्यानेच त्यांना हा दिलासा मिळाल्याची चर्चा आता होऊ लागली आहे.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.