Vidhan Sabha 2019, देशमुख कुटुंबियांनी बजावला मतदानाचा हक्क

74

लातुर : सर्वांचं लक्ष लागलेल्या राज्याती विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे.  दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी मूळगावी बाभळगाव येथील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

आमदार अमित देशमुख हे लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा तर धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत.

बाभळगावात सकाळी पाऊस सुरू असतानाच सर्व कुटुंबियांनी केंद्रावर येऊन मतदान केले. या वेळी माजीमंत्री दिलीपराव देशमुख, वैशालीताई देशमुख, आमदार अमित देशमुख, आदिती देशमुख, अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री जेनेलिया देशमुख, धीरज देशमुख व दीपशिखा देशमुख यांनी मतदान केले

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.