एक्झिट पोलबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

60

मुंबई : महाराष्ट्र व हरियाणा या दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसह १७ राज्यांमधील ५१ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांसाठी तसेच, महाराष्ट्रातील सातारा व बिहारमधील समस्तीपूर येथील लोकसभेच्या जागेसाठी मतदान २१ऑक्टोबर होणार आहे.

त्यामुळे यादिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाने एक्झिट पोल दाखवण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुका पाहता, त्या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत एक्झिट पोल दाखवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतटं ट्वीट निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्या शेफाली शरण यांनी केलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.