माधव पोले यांना महात्मा ज्योतीराव फुले शिक्षण परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान..

70

हिंगोली/प्रतिनिधी:- महात्मा ज्योतीराव फुले शिक्षण परिषदेचा यंदाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मधोमती विद्यालयाचे माधव पोले यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.शहरातील महावीर भवन येथे काल दि.18(रविवार) रोजी पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महात्मा ज्योतीराव फुले शिक्षण परिषदेमार्फत दरवर्षी शिक्षण क्षेत्रातील गुणवंतांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.यावर्षीही मोठ्या उत्साहात परिषदेने गुणवंतांना विविध पुरस्काराने सन्मानित केले.यावेळी आ.तानाजी मुटकुळे,राष्ट्रवादीचे दिलीप चव्हाण,जिल्हा परिषद सदस्य अजित मगर यांसह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

या पुरस्काराबद्दल पोले यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.