कर्तव्यात कसुरी, तीन पोलिसांचे निलंबन, खासगी वाहनांचे नुकसान केल्याचे व्हिडिओतून समोर आले.

633

हिंगोली/प्रतिनिधी:- काल शहरात बकरी ईद सणा निमित्त बंदोबस्ताच्या वेळी खासगी वाहनांचे नुकसान केल्याचे व्हिडिओ क्लिपमधून समोर आल्यामुळे दोन पोलीस शिपाई आणि एक पोलीस नाईक यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली.

काल शहरात दोन गटांत वाद निर्माण होऊन तुफान दगडफेक झाली.परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त लावण्यात आला होता.या बंदोबस्ताच्या वेळी पायी पेट्रोलिंग शहरातील मस्तानशहा नगर येथे आल्यानंतर सदरील पोलीस रस्त्यात उभे असलेल्या खासगी मोटारसायकल, ऑटो इत्यादी वाहनांवर त्यांच्या जवळील शासकीय लाठीने मारून नुकसान केल्याचा विडिओ सर्वत्र प्रसिध्द झाला.त्यामुळे पोलिसांची प्रतिमा जनमानसात मालिन झाल्यामुळे त्यांना कर्तव्यात अतिशय गंभीर स्वरूपाची कसुरी केल्यामुळे निलंबन झाले आहे.

पोलिस शिपाई गणेश वाबळे,पोलीस नाईक विलास शिनगारे आणि पोलीस शिपाई नितीन रामदिनेवार यांचावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.