मुंबईत दुधाचा तुटवडा भासणार नाही ; अर्जुन खोतकर यांची ग्वाही

56

मुंबई : राज्यातील इतर भागातून दूध उपलब्ध करून दिले जात असल्याने आता मुंबईत दुधाचा तुटवडा भासणार नाही, अशी ग्वाही पशूसंवर्धन, दुग्ध विकास आणि मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे मुंबई शहर परिसरातील दूध तुटवड्याचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.

मुंबई शहर परिसरात दररोज सुमारे ३५ लाख लिटर पिशवीबंद दुधाची विक्री होते. यात मुंबई शहर आणि परिसरात लागणाऱ्या दुधाचा पुरवठा राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली,पुणे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर व जळगाव जिल्ह्यातून होतो. मुंबई शहर परिसरात प्रामुख्याने अमुल, गोकुळ,वारणा, प्रभात, राजहंस, मदर डेअरी, गोवर्धन, विकास इ. प्रमुख ब्रॅन्डचे दूध विक्रीसाठी येते.

१० ऑगस्ट रोजी प्रमुख सहकारी व खाजगी प्रकल्पांकडून मुंबईत पुरवठा झालेल्या सुमारे ३१.५४ लाख लिटर दुधाच्या तुलनेत दि. ११.८.२०१९ रोजी ३१.०३ लाख लिटर दूध वितरण झाले आहे. म्हणजेच दि. १०.८.२०१९ रोजीच्या तुलनेत शहरातील वितरणात ०.५१ लाख लिटरने कमी झाले. दि.१०.८.२०१९ रोजीच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा सहकारी दूध संघाचा मुंबईतील दूध पुरवठा नियमीत झाला असून फक्त गोकुळ सहकारी दूध संघामार्फत मुंबईत येणारे दूध सरासरी ६.७५ लाख लिटरऐवजी १.४८ लाख लिटर मुंबई वितरणासाठी उपलब्ध झाले.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.