रितेश जेनेलियाकडून पूरग्रस्तांना २५ लाखांची मदत

227

मुंबई : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला पुराचा मोठा फटका बसला आहे. याठिकाणच्या नागरिकांचे मोठे हाल झाले असून पूरग्रस्तांसाठी राज्यभरातील अनेक संस्था मदतीला धावून आल्या आहेत. अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया हे देखील आता पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले असून पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी २५ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्त केले आहे.

 

याबाबतचं ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आपल्या ट्विट अकाऊंटच्या माध्यमातून रितेश आणि जेनेलियाने केलेल्या मदतीची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करताना लिहिलं आहे की, “रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपयांचे योगदान दिले. मी त्यांचा आभारी आहे!”.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.