लाखच्या जिल्हा परिषद शाळेत योगदिन साजरा.

266

हिंगोली/प्रतिनिधी:- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त लाखच्या जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आज विद्यार्थ्यांनी विविध योगासने केली.शिक्षक,विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

आज 21 जून रोजी पाचवा आंतरराष्ट्रीय योगदिन सर्वत्र साजरा होत आहे.शारीरिक आणि मानसिक व्याधीतून मुक्तता मिळण्यासाठी योगासने अत्यंत आवश्यक आहेत.सहशिक्षक उत्तमराव वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी विविध योगासने केली.योगासनाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगून दररोज सकाळी योगासने करा असा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक खिल्लारे, ऊत्तम वानखेडे,बांगर,गिरी,शारदा सामले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय चव्हाण,गुणाजी ठाकरे,ऋतुजा लोंढे उपस्थितीत होते.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.