विलासराव देशमुख असते तर काँग्रेसला प्रचंड यश मिळाले असते : उल्हास पवार

193
मुंबई : काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख असते तर २०१४ मधील निवडणुकीतही काँग्रेसला प्रचंड यश मिळाले असते असं वक्तव्य माजी आमदार उल्हास पवार यांनी केलं आहे. देशात २०१४ साली झालेल्या निवडणुकीत एक वेगळं वातावरण असल्याने भाजपला यश मिळाले. पण त्या निवडणुकीत विलासराव देशमुख असते. तर काँग्रेस पक्षाला प्रचंड यश मिळाले असते आणि राज्याचं नेतृत्व देखील विलासरावांनी केले असते असं पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे कार्यकर्ता आपलासा करण्याचे एक वेगळं कौशल्य होते. त्यांना एकदा कार्यकर्ता भेटला की त्यांच्यापासून कधी दूर गेला नाही. त्यामुळे राज्यातील अनेक भागात विलासरावांनी कार्यकर्ते तयार केले. आज या निवडणुकीच्या काळात त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण निवडणुकीच्या काळात राज्यभरात त्यांच्या अनेक भागात सभा व्हायच्या. तेव्हा हजारो लाखोंच्या सभा मी स्वतः पाहिल्या असून एकदा सभा ठिकाणी आलेला माणूस किंवा कार्यकर्ता विलासरावांचे भाषण सुरू झाल्यावर उठून जात नव्हता अशी आठवणही पवारांनी करुन दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.