‘मोदी’ हा मोठा ब्लॅकमेलर ; प्रकाश आंबेडकर

70

मुंबई : ‘मोदी’ हा मोठा ब्लॅकमेलर आहे. आधी त्यांनी काँग्रेसला ब्लॅकमेल केलं आणि आता शिवसेनेला. इतकं ब्लॅकमेल केलं की एका दिवसात त्यांनी विचार बदलला, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. ते कुर्ल्यातील प्रचारसभेत बोलत होते.

मोदी हे एक नंबरचं खोटारडं पात्र आहे. जेव्हा पाकिस्तानवर हल्ला झालेला तेव्हा उतावळा नवरा असलेल्या आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं की आम्ही ३०० दहशतवादी मारले. त्यावेळी त्यांनी एकतरी मेलेला दहशतवादी दाखवला का?, असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

आता मोदी म्हणत आहेत मला ५ वर्ष पुन्हा निवडून आणा, मी घोटाळेबाजांना आतमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, मला सांगा मोदी तुम्ही रॉबर्ट वाड्राला का आतमध्ये टाकत नाहीत, असेही आंबेडकर म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.