‘मित्रा तू चुकलास’ आशिष शेलारांकडून राज ठाकरेंवर टीका

1,099
मुंबई : गेली २० दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी असत्य मांडण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांनी ३२ वेळा सणसणीत खोटं दाखविण्यात आले. राज यांना कोणत्याही अधिकृत ठिकाणावरून माहिती घेतली आणि खोटे दाखविण्याचा प्रय़त्न केला. आता तुमची पोलखोल आम्ही केली आहे. १९ प्रकरणांवर आम्ही आढावा घेतला आहे. सत्याच्या आधारावर राजकारण करणे ही आमची संस्कृती आहे. राज मित्रा खरंच तू चुकलास, अशी खंत मी मांडतो, असे भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले आहे.

खोटं बोल रेटून बोल हे तुमच्याकडून महाराष्ट्र शिकतोच आहे.  राज ठाकरे यांना ‘मित्रा तू चुकलास’ असा इशारा दिला. यावेळी त्यांनी पहिला व्हिडिओ राज यांच्या सभेतील राहुल गांधीना सत्ता देऊन पाहू या विधानाचा दाखविला. यानंतर अजित पवारांवर राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांनी कसे झापले याचा व्हिडिओ दाखविला. तसेच तेव्हा केलेली टीकाही त्यांनी दाखविली. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर राज ठाकरे यांनी मिमिक्री केलेल्या टीकेचे व्हिडीओ या रंगशारदामधील सभेवेळी दाखविण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.