मनसेला मनसेच्याच स्टाईलनं उत्तर देणार : तावडे

730

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध सभांमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून भाजपला अडचणीत आणलं आहे. आता भाजपही राज ठाकरेंना जशास तसे उत्तर देण्याच्या तयारीत आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. २७ तारखेला मनसे स्टाईलने ‘लाव रे तो व्हीडिओ’ सांगत प्रत्युत्तर देणार असल्याचं विनोद तावडेंनी सांगितलं आहे.

तसेच आमची राज ठाकरेंना विनंती आहे की, २७ एप्रिलनंतरही त्यांनी त्यांच्या सभा सुरु ठेवाव्यात. कारण या टुरिंग टॉकीजमुळे जनतेची चांगली करमणूक होत आहे. तसेही राज ठाकरेंचा एकही उमेदवार निवडणूक लढवत नाही. त्यामुळे राज ठाकरेंना त्यांची स्टँडअप कॉमेडी सुरु ठेवायला काही हरकत नसल्याचा टोलाही विनोद तावडेंनी लगावला आहे.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.