शरद पवार नातवाचे लाड पुरवत आहेत- प्रकाश आंबेडकर

125

पुणे/प्रतिनिधी:- शरद पवार नातवाचे लाड या लोकसभेच्या माध्यमातून पुरवत आहेत. लहान मुलाला चॉकलेट दिल्याप्रमाणे पार्थला उमेदवारी दिली,अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर केली आहे.ते पुण्यामध्ये प्रचारसभेत बोलत होते.

लोकसभेच्या प्रचाराला मागील दोन दिवसांपासुन गती आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. आज मावळ लोकसभा मतदारसंघात प्रचार सभेला संबोधित करताना त्यांनी पवारांवर सडकून टीका केली.

उद्याची सत्ता रेव्ह पार्टी करणाऱ्यांच्या हातात देणार का, असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.योग्य उमेदवाराला देण्याचे आवाहन सभेत केले.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.