Women’s day २०१९ : स्त्री ‘काल’ आणि ‘आज’ …!

94

स्त्री ‘काल’ हि श्रेष्ठ होती आणि ‘आज’ सुद्धा श्रेष्ठच आहे. परंतु आपला बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. “कालची स्त्री पाहायला गेलं तर आपण समजतो कि चूल नि मूलं सांभाळणारी एक अबला नारी,” परंतु असे असते तर लक्ष्मीबाई झाशीच्या राणी झाल्या असत्या का? इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या असत्या का? सावित्रीबाई पहिल्या शिक्षिका झाल्या असत्या का? जिजाऊ राजमाता झाल्या असत्या का? मेरी क्युरी थोर शास्त्रज्ञा झाल्या असत्या का? मुक्ताई, जनाई व मीराबाई संत झाल्या असत्या का? या त्याचं सगळ्या महिला आहेत ज्याचं नाव आजही घेतलं कि मान ताठ मानेने उभी राहते. या महिलांनी सुद्धा शून्यातून जग निर्माण निर्मिती केलं आणि म्हणून त्या आजवर इथंपर्यंत पोहोचल्या आहेत. अश्या कितीतरी महिला आहेत कि त्यांनी चूल नि मूलं न बघता उंच अशी आकाशात भरारी घेतली आणि जगाला दाखवून दिलं कि स्त्री किती महान आहे ते.

कालही तिच्यावर बंधने होती आणि आजही आहेत तरीही तिने त्या बंधनांना झिडकारून आपले यशस्वी पाऊल रोवले. पण काळाच्या आड काही विविध घटना घडल्या म्हणजे युद्ध, परकीयांचे आक्रमण अवमानीय कुकृत्ये अशा घटनांनामुळे स्त्रीचे संरक्षण धोक्यात आले यातूनच समाजाने महिलांभोवती काही बंधने टाकली कि यातून स्त्री सुरक्षित राहू शकेल परंतु हे बंधने पावलो पावली खुपच वाढत गेले व महिलांचे अबलाकरण झाले, यातूनच फक्त चूल नि मूलं सांभाळणारी अबला नारी हा शिक्का तिच्यापुढे कायम रेटला गेला. जे काही धाडसाचे निर्णय आहे ते फक्त पुरुषानेच बघावे वित्त, शिक्षण, घराची जबाबदारी व सामाजिक कार्ये हे पुरुष बघतील आणि स्त्री हि चूल नि मूलं बघेल मग कशाला हवा महिलांना इतर अधिकार या खुळ्या भावनांनी स्त्री चे सर्व यशाचे दरवाजे बंद केले. यामुळेच महिलांचा विकास खुंटला गेला आजही खेडेगावाच्या दुर्गम आदिवासी भागात हि चित्रे पहावयास आपल्याला मिळतात.

आजच वास्तव उलगडून पाहायचं झालं तर अजूनही महिलांना दुय्यम स्थानावर मानलं जातं. अजूनही समाजात, बाहेर, नातेवाईकांमध्ये तिला बंधने लागू केले जातात. हा प्रकार ग्रामीण भागामध्ये जास्त पहावयास मिळते. पण आज या स्त्रियांनी अनेक कार्ये केले आहेत चूल नि मूलं सांभाळून या स्त्रिया पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहे आणि हे दृश्य आज आपल्याला पहावयास मिळतो आहे. पण अजूनही मुलगा आणि मुलगी हा भेदभाव सुरूच आहे.

पुढे मुलगा मुलगी भेदामुळे मुलगा हा वंशाचा दिवा म्हणून त्यास प्रथम स्थान व मुलगी म्हणून दुय्यम स्थान दिले गेले, कशी शास्त्रीय शंकाकुशंका यांच्या विपर्यासामुळेही मुलगी धार्मिक सामाजिक कार्यातून बाजूला ठेवली गेली व तिचा सर्वांगीण विकास खुंटवला गेला. घरातही मुलगाच हवा म्हणून स्त्री भ्रूण हत्या इतिहासात होता नि आजही मोठा प्रश्न उभाच आहे. सगळे म्हणतात वंशाचा दिवा म्हणजे मुलगा. अहो! पण जरा विचार करा जर तिच नसेल तर दिवा कसा लागणार…?

स्त्री स्वतःच असा एक महिमा आहे. ती पुरुषाची जननी आहे. आपण परमेश्वरा नंतर सर्वात जास्त ऋणी कुणाचे आहोत तर ती आहे स्त्री. कारण परमेश्वर आपल्याला मनुष्य जीवन देतो तर मातृ शक्ती स्त्री जगण्यायोग्य बनवते. स्त्री हे स्नेह, सौजन्याची देवी आहे. ती पुरुषाची निर्मिती आहे. कोणत्याही राष्ट्राचा उत्कर्ष स्त्री जातीच्या उन्नतीनेच होतो.

आज समाजात व्याप्त असलेल्या कू. रीतींच्या उन्मुलना मध्ये स्त्रीच्या सहयोगाची फार जास्त गरज आहे. नवयुगाचे नेतृत्व स्त्री च करेल परंतु त्या आधी तिला आपली पात्रता सिद्ध करावयाची आहे, आपल्या शक्तीची सामर्थ्याची ओळख करून द्यावयाची आहे .

राष्ट्राची भावी पिढी घडवणारी आईचं आहे. समाजाचे अर्धे अंग स्त्री आहे कारण निम्याहून काहीशी संख्या स्त्रियांचीच आहे. ती फक्त पुरुषाची अर्धांगिनी नाही तर समाजाचे अर्धे अंग सुद्धा ती स्त्री च आहे. तर वास्तविक पाहायला गेले तर स्त्री हि परिवाराची सूत्रसंचालीका आहे. आई, पत्नी, बहीण व मुलीच्या रुपाने तिच गृहलक्ष्मी समाजाला नररत्न देते. आपल्या परिवाराला, समाजाला स्वर्ग बनवणे हि तिच्याच हातात असते. जरी सगळी सृष्टी ईश्वराने बनवली असली तरीही स्त्री च हि कुटुंबाला स्वर्ग बनवते. तिच्या गुणांचे वैशिट्याचे वर्णन केले तर सर्व जग तिच्या त्यागा खाली दाबून जाईल…!
त्याग, प्रेम, स्नेह, सन्मान, सहयोग, सहनशीलता हे सर्व गुण स्त्री मध्ये पुरुषापेक्षा जास्त आहेत. समाजामधले संपूर्ण लोक स्त्री च्या सेवा सहकार्याचे गतीमान आहे. सृष्टी निर्मात्याच्या सहयोगी शक्तीचे दुसरे नाव म्हणजे स्त्री.

स्त्री कालही असुरक्षित होती आणि आजही ती असुरक्षित आहे. जो पर्यंत समाज सुधारणार नाही तो पर्यंत महिलांचा प्रश्न अविरत चालूच राहणार. आजही स्त्री सुशिक्षित झाली नोकरी व्यवसाय करते. परंतु दररोज कुठेना कुठे बलात्कार, विनयभंग, भ्रूणहत्या, घरातही सासुसासऱ्यांचा छळ, नवऱ्याचा छळ, त्यातून तिची हत्या कधी स्वतःहून जीवाला कंटाळून आत्महत्या करते अश्या कितीतरी समस्या आजही तिच्यापुढे डोकं वर काढून उभ्याच आहेत. एकूणच आजही स्त्री सुशिक्षित झाली परंतु सुरक्षित अजून हि झालेली नाही.

या पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांना नेहेमीच दुय्यमत्त्व स्थान दिले आहे. आज राजेशाही नष्ट होऊन लोकशाही आलेली आहे. म्हणूनच आजची स्त्री काही स्तरावर आपले अधिकार गाजवू शकली आहे. खासदार असो, आमदार असो, शिक्षिका असो, बस कंडक्टर, पोलीस, विमान पायलट, वार्ताहर, बातमीदार, पत्रकार, खेळाडू, अभिनेत्री, मंत्री अश्या विविध क्षेत्रात आपली यशस्वी कामगिरी पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन ती जगात आहे. हे कालच्या स्त्री पेक्षा नक्कीच आजच्या स्त्री चे योगदान आहे.

काही विशिट्य सुशिक्षित घरण्यातच महिलांनी आवाज उठवून बंधनांना लढा देऊन आदर्श उभा केला. म्हणूनच आजच्या स्त्रीला समानतेचा अधिकार लागू करण्यात आला. आज आपल्या कडे खूप सारी उदाहरणे आहेत. जर तुम्ही नीट निरखून पाहिलं तर, प्रतिभाताई पाटील, कल्पना चावला, मदर तेरेसा, सिंधुताई सपकाळ, लतादीदी, सानिया मिर्जा, साक्षी मलीक, सिंधू, ऐश्वर्या रॉय, पी.टी. उषा व दीपा फोगट यांनी आपापल्या कार्य क्षेत्रात यशोशिखर सर केले. याच महिला नाही तर, अजून अशा कितीतरी महिला आहेत ज्या उंच शिखर गाठून आपलं नाव समाजात, देशात उज्वल करता आहेत. या महिलांना सुद्धा बंधने आडवी आलीच परंतु त्यांनी त्या विरुद्ध लढा दिला व महिला काही कमी नाही अबला नाही हे जगला दाखवून दिले.

एक सांगायचं झालं तर कालची स्त्री व आजची स्त्री सारखीच आहे. फरक फक्त ऐवढाचं आहे कि, त्यावेळी अधिकार नव्हता व आज स्त्री पुरुष समानतेचा अधिकार आहे. ती आपली कार्यशक्तीचा वापर करून आपले व्यक्तिमत्व विकास साकार करू शकते, म्हणूनच असे म्हणतो कि स्त्री शक्ती आहे तमाम स्त्रियांनी जागृत होऊन सर्व आव्हाने स्वीकारून बंधनांना झिडकारून पुन्हा नवा इतिहास घडवावा, हीच इच्छा..!

तूच माता, तूच सरस्वती
तूच कालिका , तूच रणरागिणी!
तूच या विश्वाची वसुंधरा
तूच सखी नि तूच दामिनी
तू जिजाऊ, तू सावित्री
तू प्रतिभा , तू कल्पना
तूच यशाची आहेस खात्री !

महिला दिनानिमित्त तुझ्यातील रंणरागिणींचे वारे घुमुदे व अखंड वाहू दे, काल काय नि आज काय या पुढेही तू तुझे नाव उज्वल कर. तुझ्याशीवाय या जगाचा उद्धार होऊच शकत नाही.

आज पहिला गेलं तर पुरुषांनी देखील उत्तम कार्य केले आहे. आज पुरुष सुद्धा उच्च स्तरावर जाऊन पोहोचले आहे. पण या सगळ्या कारणांमध्ये तुम्हाला असलेली स्त्री ची साथ जास्त महत्वाची ठरते म्हणूनच असं म्हटलयं एक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचाचं हात असतो.

लेखिका :

✍🏻– हर्षदा हरसोळे

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.