पॉलीहाऊस उभारण्यासाठी सरकारतर्फे ५०% अनुदान

306

देशातील शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढावे तसेच पारंपरिक शेतीला बगल देत आधुनिक शेतीला प्राधान्य दयावे या उद्देशाने यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारकडून अनेक योजना शेतकऱ्यांसाठी नव्याने आणल्या जात आहेत. त्यातीलच एक म्हणजे पोळी हाऊसद्वारे शेती करणे. या योजनेंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांना १००८ ते ४०८० चौ. मी. पॉलीहाऊस उभारण्याकरिता प्रकल्प खर्चाच्या पन्नास टक्के अथवा प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के यापैकी जे जास्त असेल तेवढे अनुदान दिले जाते, तसेच सर्वसाधारण पॉलीहाऊस ५६० ते ४०८० चौ. मी.पर्यंतसुद्धा प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के अथवा प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के अनुदान दिले जाते.
जगात सध्या शेतीमध्ये पॉलीहाऊसद्वारे शेती करणे सर्वात आधुनिक म्हणून गणले जाते. विकसित देशांमध्ये जवळपास सर्वच शेतकरी पॉलीहाऊस शेती करतात. शासनाकडून आपल्या देशातही शेतकऱ्यांनी पॉलीहाऊस उभारण्यासाठी अनुदान दिले जाते.राज्यातही अनेक ठिकाणी पॉलीहाऊस, तसेच शेडनेटच्या माध्यमातून शेतकरी यशस्वीरीत्या शेती करीत आहेत. यात भाजीपाला, तसेच फुलशेती करण्याकडे शेतकऱ्यांचा विशेष कल असतो.

प्रतिक्रिया द्या

Your email address will not be published.